विषय - हिमगिरी शासकीय निवास्थान, परभणी येथील दुरुस्ती करुन मिळणे बाबत.
संदर्भ - मा. जिल्हाधिकारी यांच्या समक्ष सुचना.
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, मा. जिल्हाधिकारी परभणी यांचे हिमगिरी शासकीय निवासस्थाना मध्ये पुढील प्रमाणे दुरुस्त्या व नविन साहित्य पुरविणे आवश्यक आहे. यामध्ये हॉल मधील व्हि.व्ही. पॅनल, काही ठिकाणी प्लास्टर, गॅरजे दुरुस्ती व इतर किरकोळ दुरुस्ती व आवश्यकतेप्रमाणे नविन साहित्य बसविणे आवश्यक आहे.
तरी कृपया आपले स्तरावरुन तात्काळ वरील प्रमाणे दुरुस्ती व आवश्यकते प्रमाणे नविन साहित्य पुरविण्याची कार्यवाही करावी व त्याबाबत या कार्यालयास अवगत करावे.